Home आरोग्य चिंचवड, संभाजी नगर येथील स्वीट अँड शाईन फिटनेस क्लब तर्फे महिला दिनाचे आयोजन

चिंचवड, संभाजी नगर येथील स्वीट अँड शाईन फिटनेस क्लब तर्फे महिला दिनाचे आयोजन

Spread the love

चिंचवड, संभाजी नगर येथील स्वीट अँड शाईन फिटनेस क्लब तर्फे महिला दिनाचे आयोजन


दिशा महाराष्ट्राची /पुणे-

जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड,संभाजी नगर येथील स्वीट अँड शाईन फिटनेस क्लबतर्फे याही वर्षी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 40 पेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

क्लब मधील महिलांनी स्वास्थ्य,शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्याचे महत्व नाट्याद्वारे पटवून दिले. यावेळेस नियमित क्लब मध्ये येणाऱ्या व वजन कमी करणाऱ्या महिलाना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलाना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.अशा वेळेस विरंगुळा म्हणून क्लबतर्फे वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

एस अँड एस फिटनेस क्लब च्या संचालिका मालिनी घारे यांनी निरोगी स्त्री व निरोगी कुटुंब याबद्दल मार्गदर्शन केले. महिलाना मार्गदर्शन करताना योगामुळे आपल्या जीवनात कसा सकारात्मक बदल होतो तसेच तणाव कमी होऊन महिलांमधील मासिक पाळी व रजोनिवृत्तीसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. याचे महत्व त्यांनी पटवून दिले. योगामुळे तणावाच्या परिस्थितही आपली जागरूकता, विचार आणि भावनांचे व्यवस्थापन करून एक आनंदी आयुष्य कसे आपण जगू शकतो याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

रेणुका हजारे व ऋतुजा पडवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

Related Posts

Leave a Comment