मुंडे महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)
मुंबई विद्यापीठाकडून आलेल्या परिपत्रकाप्रमाणे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे जे विद्यार्थी मार्च – 2023 मध्ये संपन्न झालेल्या तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयाच्या कार्यालयास प्राप्त झालेली आहेत.
सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ बुधवार दिनांक २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तरी तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील मार्च- २०२३ मध्ये परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या संबंधीत विद्यार्थ्यांनी सदर दिवशी पदवीदान समारंभास वेळेवर उपस्थित राहून आपले पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट) घ्यावे.
अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव व उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी केले आहे.