Home शैक्षणिक मंडणगडमध्ये ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती पथनाटय’ सादरीकरण

मंडणगडमध्ये ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती पथनाटय’ सादरीकरण

Spread the love

मंडणगडमध्ये ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती पथनाटय’ सादरीकरण


दिशा महाराष्ट्राची / मंडणगड 
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला ,वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयातील आजिवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने मंडणगड तहसिलदार कार्यालयासमोर ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती पथनाटय’ सादर करण्यात आले.
यावेळी  मंडणगडचे तहसिलदार श्रीधर गालीपेल्ली, नायब तहसिलदार उदयसिंह जाधव, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मर्चंडे, मंडणगड पोलीस प्रतिनिधी येलकर, मंडणगड होमगार्ड तालुका समुपदेशक प्रदीप मर्चंडे, संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे, पत्रकार श्री. विजय जोशी , श्री. महेश महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, विस्तार विभाग समन्वयक डॉ.  शामराव वाघमारे, प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. शामराव वाघमारे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट  केला. त्यानंतर तहसिलदार श्रीधर गालीपेल्ली यांनी सदर उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून पर्यावरण जनजागृती करणे किती आवश्यक आहे हे सांगताना निसर्गाकडून आपण जेवढे घेतो, त्यापेक्षा जास्त भरपाई केली पाहिजे. यासाठी एक झाड तोडण्यापूर्वी चार झाडे लावा, स्वतःला निसर्गप्रेमी बनवा. निसर्गाचा अभ्यास करा. प्रत्येकानी निसर्गस्नेही जीवन जगताना आवश्यक तेवढयाच किमान गरजा पूर्ण केल्या पाहिजेत की ज्यामुळे कमीत कमी उत्पादन, कमीत कमी नैसर्गिक साधनांचा वापर होईल. यातूनच पृथ्वीचा, निसर्गाचा विनाश टाळणे शक्य होईल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी प्लास्टीकमुळे आपणाला अनेक रोगाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगून प्लास्टीक वापरावर सरकारच्या वतीने समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील मुलांनी ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर  पथनाटय सादर करुन जनजागृती करण्यात आली.
यामध्ये महाविद्यालयातील विस्तार विभागातील ऋतुजा खामकर, ऋतूराज पवार, गायत्री वाघ, आर्या कदम, दिया रेवाळे, रुणाली सागवेकर, शिवानी बदे, अमीशा तांबे, प्रणय मालुसरे, शुभम पाडेकर, सायली गोरिवले, सानिया  कोंडविलकर या विद्यार्थ्यांनी पथनाटयामध्ये सहभाग घेतला होता.  यावेळी एस. टी. स्टॅन्ड व तहसिलदार कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आले.  या पथनाटय बसविण्यासाठी विस्तार विभागप्रमुख डॉ. शामराव वाघमारे, प्रा. संदीप निर्वाण यांनी विशेष  परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. संदीप निर्वाण यांनी मानले.

Related Posts

Leave a Comment