बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षित शिक्षिका दिपाली शिरसाट “नारीरत्न गौरव पुरस्काराने” सम्मानित
दिशा महाराष्ट्राची / मुंबई –
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ||
ह्या म्हणीची प्रचिती येणारा सोहळा नुकताच नवी मुंबई, वाशी येथे पार पडला. लामन इंडस्ट्रिअल पार्क प्रस्तुत लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार 2023- 24 या पुरस्काराने श्रीम. दिपाली राहुल शिरसाट (बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षित शिक्षिका) यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी दिनांक 6 जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मराठी चित्रपट “थर” चे निर्माते श्री. विशाल चौहान आणि लेक माहेरचा कट्टा या समूहाच्या अडमिन कविता कोंडभर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.