सामाजिक बांधीलकी जपत UHRC महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा सुवर्णा कदम यांचा वाढदिवस साजरा
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
युनिव्हर्सल ह्युमन राईटस कौन्सिल भारत च्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे स्टेशन येथे गोरगरिब जवळजवळ 70 महिलांना नवीन साड्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमास युनिव्हर्सल ह्युमन राइटच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमास आरंभ सोशल फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी आनंदाने सहभागी झाल्या. कार्यक्रमात राणी गुप्ता, मालती विधाते, प्राची उबाळे, रोशनी ताई, स्मिता, प्रियंका मिस्त्री, प्रियंका सुतार, अनिता सिंग ,गंगा विश्वकर्मा, ममता चव्हाण, आमिता गौतम, कशिश जयस्वाल, संजना गुप्ता, रंजना गुप्ता, गुंजा गुप्ता, अमृता नाईक, प्रियांका कोरी, नर्सिंगच्या शिक्षिका ज्योती नारंगेकर मॅडम, वर्षा गायकवाड, उपासना चव्हाण, श्रुती रणदिवे, ममता बेहरा, ललिता वीरकर, श्र्वेता ठाकूर, मयुरी राजापकर, पूजा गुप्ता, निधी अबुगुल, दीक्षा गुरव, अक्षता गुरव, अर्चना चव्हाण, तसेच बऱ्याच लहान मुलांचाही समावेश होता. उपस्थित सर्व महिलांचे कदम यांनी आभार मानले.