ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर तालुका कार्यकारिणी जाहीर- अध्यक्षपदी ऍड. सुशील अवेरे यांची वर्णी
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर/ उदय दणदणे)
मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी “ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन” ह्यांचे मार्फत गुहागर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंताचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यामध्ये वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील डॉ. बाळासाहेब ढेरे, सुप्रसिद्ध वकील ऍड. संकेत अरुण साळवी, सामाजिक कार्यकर्ते संदीप भिकू मांडवकर, शाम हरिचंद्र शिर्के, अपंग पुर्नवसन संस्थेचे अध्यक्ष उदय वसंत रावणंग यांची विशेष सल्लागार पदी तर अध्यक्षपदी सुप्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे वकील ऍड. सुशील गणपत अवेरे, उपाध्यक्षपदी अरुण महादेव मालप, कार्याध्यक्षपदी सुधाकर शामराव कांबळे गुहागर हायस्कूल मुख्याध्यापक, सचिवपदी अमरनाथ विष्णू मोहिते, कोषाध्यक्ष सरपंच जामसूद महेश यशवंत जामसुतकर, महिला अध्यक्षपदी पूजा प्रवीण कारेकर तर महिला सचिव पदी कामिनी अनुप कोवळे यांची नियुक्ती ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळकृष्ण सोनू वनकर यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
सदर निवडीच्यावेळी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन राष्ट्रीय सचिव गणपतराव कदम, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळकृष्ण सोनू वनकर, जिल्हाध्यक्ष तेजेश भोपाळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोथरे, जिल्हा सचिव विजय आंब्रे, जिल्हा सल्लगार मुरादबाबा मुकादम व दापोली तालुका अध्यक्ष अमोल दयाळकर उपस्थित होते. जिल्ह्यामधून या सर्व नव नियुक्त कमिटीचे अभिनंदन केले जात आहे.
लवकरच गुहागर तालुक्यामध्ये ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गुहागर कार्यकारिणीच्या वतीने गुहागर तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम व जनजागृती मोहीम राबवून तालुक्यातील अनेक चांगल्या व्यक्तींना या चळवळीमध्ये सहभागी केले जाईल असे नुतन कार्यकारणी वर अध्यक्ष पदी निवड झालेले सुप्रसिद्ध वकील ऍड. सुशील गणपत अवेरे यांनी नमूद केले आहे.