मुंडे महाविद्यालयात जिमखान्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष व भारत सरकारच्या विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्डाचे अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते नुकतेच जिमखान्याचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील मा. श्री. अमीट ओम मावी हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रविंद्रकुमार मिश्रा, संचालक श्री.अजीत आंब्रे, सौ. संपदा पारकर, श्री. आदेश मर्चंडे, प्राचार्य प्रा. डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, क्रीडाप्रमुख डॉ. मुकेश कदम, डॉ. विनोदकुमार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. राहूल जाधव यांनी संस्थापक अध्यक्ष व भारत सरकारच्या विमुक्त जनजाती कल्याण व विकास बोर्डाचे अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते तसेच प्रमुख पाहुणे श्री. अमीट ओम मावी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तर इतर मान्यवरांचे स्वागत डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी केले. तत्पूर्वी क्रीडाप्रमुख डॉ. मुकेश कदम यांनी प्रस्तावना करताना जीमखाना इमारतीबाबत व महाविद्यालयामध्ये वेळोवेळी आयोजित करण्यात येणा-या विविध क्रीडासंबंधी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमास शुभेच्छा देताना श्री. अमीट ओम मावी यांनी महाविद्यालय व संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी कर्मवीर दादा इदाते म्हणाले की, आपले मन व शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता व्यायामाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. त्याकरिता व्यायाम केल्यास त्याचे दूरगामी फायदे आपणास निष्चितच पाहवायस मिळातात. व्यायामुळे आपले षरीर बळकट बनते. या उपलब्ध क्रीडा साहित्याचा जास्तीत जास्त उपयोग करुन विद्याथ्र्यांनी आपले क्रीडा कौशल्य विकसीत करावे. शिक्षणाबरोबरच खेळाकडेसुध्दा विद्याथ्र्यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी मानले.