सुधागड मध्ये श्रमदानातुन बांधले वनराई बंधारे
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य गावाचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी एकत्र आले आहेत. स्वयंप्रेरणेने एकजुट होऊन श्रमदान करुन नुकतेच दोन वनराई बंधारे बांधले आहेत.
सिध्देश्वर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ व शंकर मंदिराजवळील ओढ्यावर हे बंधारे बांधण्यात आले. कोयता कुदळ फावडे आदी सामग्री घेऊन वृद्ध व महीला तरुणाच्या खाद्याला खांदा लावुन काम करु लागले . या सगळ्यासोबता आदिवासी बांधवही सहभागी झाले होते. दोन बंधारे बांधले यामुळे येथील भूजल पाताळी वाढणार आहे त्यामुळे उन्हाळ्यात विहीर तलाव कुपनलिकांना मुबलक पाणी राहील .
या श्रमदान मोहीमेत सरपंच आशिका पवार उपसरपंच शरद किजावडे समृद्धी यादव संजना फाळे सुरेश पवार ग्रामसेवक ए.टी.गोरड बबन वाघमारे गणेश महाले सचिन मुंडे रसिका वरघडे यांचा सहभाग होता.