प्रजासत्ताक दिनी उमराठ येथे दिवंगत माजी सैनिकाच्या ९५ वर्षीय पत्नीच्या हस्ते झाले ध्वजारोहण
(दिशा महाराष्ट्राची / गुहागर- उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे २६ जानेवारी २०२३ रोजी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवून दिवंगत माजी सैनिकाच्या ९५ वर्षीय पत्नीला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करून त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.
उमराठ गावचे दिवंगत माजी सैनिक नारायण रामचंद्र पवार यांच्या ९५ वर्षीय पत्नी श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांच्या शुभ हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी सर्वप्रथम निमंत्रित प्रमुख पाहुण्या श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि त्या नंतर त्यांच्या हस्ते सरपंचांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर जि.प. शाळा उमराठ नं.१ येथे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा फडकविण्यात आला.
यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर, मुख्याध्यापक रामाणे सर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले,अनिल पवार, नामदेव पवार तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त यथोचित भाषणे व मार्गदर्शन केले. तर पोलीस पाटील वासंती आंबेकर हिने राष्ट्रभक्तीपर गाणे गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत आणि व्यायामाद्वारे उत्कृष्ट विविध मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांचे मनोरंजन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थी बालमित्रांचे भरभरून कौतुक केले.
या प्रसंगी सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या अर्पिता गावणंग, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर, ग्रामस्थ अनिल पवार, सुरेश पवार, प्रकाश पवार, नामदेव पवार, महेश गोरिवले, विनायक कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, अशोक जालगावकर, देवेंद्र जालगावकर, अविनाश कदम, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, समृद्धी गोरिवले, आशा सेविका वर्षा गावणंग, अंगणवाडी वाडी सेविका राधा आंबेकर, वर्षा पवार, अंगणवाडी मदतनीस निलम जोशी, समृद्धी गोरिवले आणि बहुसंख्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप रामाणे सर, पदवीधर शिक्षक श्री अनिल अवेरे सर, उपशिक्षिका सौ. प्रियांका कीर, सौ. सायली पालशेतकर मॅडम तसेच विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग व प्रशांत कदम इत्यादी मंडळी उपस्थित होते.