डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तिसर्या दिवशी ही प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंत्यांचे बे मुदत ठिय्या आंदोलन सुरूच
(दिशा महाराष्ट्राची / दापोली )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तिसर्या दिवशी ही प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंत्यांचे खालील मागण्यांसाठी बे मुदत ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
1.कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषि सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी.
2. राज्यांमध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे.
3. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा.
अशा अनेक विषयांबर संबंधित कृषि अभियांत्रिकी पदवीधारक आंदोलनासाठी बसून आहेत. दापोलीत हे असे वेगवेगळ्या विषयांवर सुरू असलेले नवीन आंदोलन. दापोलीला नक्की नजर कोणाची लागली आहे हा चर्चेचा विषय आहे. दापोलीतील प्रशासन कुठेतरी कमी पडताना नक्कीच दिसून येते.
संबंधीत विषयावर लवकरात लवकर तोडगा कसा निघेन यावर सर्वांचे लक्ष आहे. कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर हा होणार अन्याय कसा दूर होईल हा विषय आता गंभीर आहे. दापोली अनेक गोष्टींनी नावाजली जाते अशा दापोलीत असेही घडू शकते हे आज पाहायला मिळू लागले आहे. प्रशासनाला जाग कधी येईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.