दलित साहित्यिक शांताबाई कांबळे अनंतात विलीन- वयाची शतकपूर्ती करून घेतला अखेरचा श्वास
(दिशा महाराष्ट्राची / वाशी- अनंतराज गायकवाड)
आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. मा. चंद्रकांत कांबळे यांच्या मातोश्री ज्येष्ठ दलित साहित्यिक लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे दि. २५ जानेवारी २०२३ रोजी वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धाप काळाने सकाळी 7.30 वाजता कोपरखैरणे येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांना चार मुलगे व एक मुलगी असा परिवार होता परंतु दोन मुले वारल्याने त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. लेखिका शांताबाई कांबळे लिखित ‘माझी सत्यकथा’, ‘नाजुका’ आदी पुस्तके गाजली होती. याशिवाय त्यांच्यावर दोन डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मस तयार करण्यात आल्या होत्या. तसेच सह्याद्री वाहिनीवर नाजुका नावाची मालिकाही प्रसारित करण्यात आली होती.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व सीमाताई आठवले यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शोक व्यक्त केला आहे. तसेच अंत्यविधी समयी ज्येष्ठ नेते सुरेश बारशिंगे, डॉ. बी. एस. जाधव, बाळासाहेब मिरजे, नवी मुंबई आरपीआय आठवले गट कार्यकारणीचे महेश खरे, एल आर गायकवाड, आप्पा शिवशरण, चंद्रकांत जगताप, विजय कांबळे, युवराज मोरे, रमेश बोदडे, शीलाताई बोदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय स्तरातून कांबळे परिवाराच्या हितचिंतकांनी दुःख व्यक्त केले आहे. जलदान विधी शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी ११ वाजता रुतुंभरा प्लॉट क्र. ७५ सेक्टर ५ कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
संपर्क –
चंद्रकांत कांबळे ९३२३५८११२१