कोकण भूमिपुत्र उदय दणदणे “वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे समाजभूषण पुरस्कार – २०२३” ने सन्मानित
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई)
आपल्यातल्या निसर्गदत्त उणिवांवर मात करत पुढे झेपावणाऱ्या,नवनवे क्षितिज, सप्ने पाहणाऱ्या व्यक्ती आणि संस्था,तसेच विविध स्पर्धा- परिक्षा उपक्रमातील गुणवंत व्यक्तींना गेली अनेक वर्षे सन्मानित करणारे, प्रेरित करणारे अभिजित राणे युथ फाऊंडेशन (रजि.) यांच्या माध्यमातून हया वर्षीचा “वीर लक्ष्मण अण्णाजी राणे- समाजभूषण पुरस्कार – २०२३ व राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन, कविता, निबंध लेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच मंगळवार दि.२४ जानेवारी २०२३ रोजी, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, (मुंबई) येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आपल्यात काहीतरी कमतरता आहे,असा नकारात्मक विचार न करता आपल्यातल्या अंगीकृत कौशल्याने काहीतरी नावीन्य करण्याची उमिद राखत,समाजात आपली वेगळीच ओळख निर्माण करणारे गुहागर तालुक्यातील मु. निवोशी (पो.पालशेत ) गावचे भूमिपुत्र, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या, लिखाण व विविध सामाजिक संघटना, व्यक्ती घटकांशी जोडत, प्रामाणिक व तळमळीने कार्य करणाऱ्या कलाप्रेमी/ समाजप्रेमी व्यक्तिमत्व उदय दणदणे यांना उपरोक्त संस्थेचा “वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे- समाज भूषण पुरस्कार २०२३” देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
उदय दणदणे यांनी लीहलेल्या लिखाण प्रवासात वृत्तपत्रातील छापून आलेले त्यांचे अनेक प्रासंगिक लेख, बातम्या, सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहून करत असलेले स्तुत्य कार्य व नियोजित वृत्तपत्र लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून मिळालेलं पारितोषिक ह्या त्यांच्या कलागुणांचा, कौशल्यांचा गौरव करणारा, त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार विजेते उदय दणदणे यांचे विविध माध्यमातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.