Home सामाजिक माथेरान नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेला सुरुवात

माथेरान नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेला सुरुवात

Spread the love

माथेरान नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छतेला सुरुवात

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

माथेरान मध्ये मागील दिड महीन्यापासुन ई रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाल्यापासुन पर्यकांची संस्था मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्याने विविध महत्वाच्या पाँईटस वर कचरा कुंड्या नसल्याने कचरा जंगलात साठला होता. या प्लास्टिक कचर्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता.

ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी सोशल मिडीयावर कळविल्यानंतर स्वच्छता प्रेमी अधीक्षक तथा तहसीलदार दीक्षांत देशपाडे यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहाणी करुन संबधीत ठेकेदारामार्फत सिमेट रेतीच्या रिकाम्या गोणी जमा करुन घेतल्या होत्या आणि जो काही अन्या प्लास्टिक कचरा प्लास्टिक बाटल्या रपर्स जंगलात इतस्तता पसरलेल्या अवस्थेत दिसत होते.

याबाबत मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना नगरपरिषदेच्या संबधीत ठेकेदारांना सुचना केल्यामुळे स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. घनकचरा ठेकेदारांना सुचना दिल्यावर कचरा गोळा केला जात आहे.

Related Posts

Leave a Comment