दिव्यामध्ये आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी लघु उद्योग प्रशिक्षण संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे)
दिव्यामध्ये आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुवर्णाताई कदम यांनी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांचे लघु उद्योग प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणात महिलांना अगरबत्ती बनवणे आणि साबण बनवणे याचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणासाठी वसई येथील डॉक्टर शशांक दळवी आणि वाड्यावरून भगवान पाटील तसेच केशव निर्मल उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांना अगरबत्ती कशी बनवावी, तसेच कोणते केमिकल किती प्रमाणात वापरावे आणि त्याचा वेळ कालावधी प्रोडक्शन बनवताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल खूप छान मार्गदर्शन केले गेले. साबण बनवताना कोणते घटक वापरले जातात किती प्रमाणात वापरले जातात कुठला सुगंध किती प्रमाणात युज केला जातो याबद्दल डॉक्टर शशांक दळवी यांनी खूप छान मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट महिलांना दिले जाईल त्याचबरोबर थोड्या दिवसात कच्चा माल देऊन सर्व महिलांकडून अगरबत्ती आणि साबण चे प्रोडक्शन तयार करून घेतले जाणार, त्यांना साहित्य पुरवले जाईल असे आश्वासन शशांक दळवी यांनी दिले. या प्रशिक्षणामुळे सर्व महिलांना एक दिलासा मिळाला आणि सर्वांना स्वयंरोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार असून महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर शशांक दळवी यांनी सांगितल्याप्रमाणे यानंतर अजून बरेचशा लघु उद्योगांचे महिलांना प्रशिक्षण दिले जाईल उदाहरणार्थ लोणचे बनवणे शेवग्याच्या शेंगांच्या पावडर पासून हर्बल प्रोडक्स बनवणे तसेच झेंडूच्या फुलांच्या झाडापासून पावडर बनवून अगरबत्ती बनवणे तसेच गाईच्या शेणापासून प्रक्रिया करून धूप अगरबत्ती बनवणे अशा बऱ्याचशा प्रकारचे महिलांना ट्रेनिंग दिले जाते आणि त्याद्वारे त्यांना लघुउद्योग उभे करून सक्षम करण्याचे आश्वासन दिले गेले, त्याबद्दल युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत च्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णताई कदम यांचे आणि टीमचे सर्वांनी धन्यवाद मानले.