Home सामाजिक वेळंब ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, बांधण्यात आला वनराई बंधारा

वेळंब ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, बांधण्यात आला वनराई बंधारा

Spread the love

वेळंब ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, बांधण्यात आला वनराई बंधारा

 


(दिशा महाराष्ट्राची / गुहागर- उदय दणदणे)


 

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान “मिशन बंधारे – २०२२- २०२३” उपक्रम हाती घेऊन सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत वेळंब च्या माध्यमातून वेळंब- कातळवाडी नदी ठिकाणी वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी वेळंब ग्रामपंचायत सरपंच समीक्षा बारगोडे, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गुहागर तालुका कृषी अधिकारी व वेळंब (कातळवाडी) ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्य श्रमदानातून हा वनराई बंधारा बांधण्यात आला असून नजीकच्या काळात गावात असे विविध उपक्रम राबविण्याचे आमचे प्रयत्न असतील असे सरपंच समीक्षा बारगोडे यांनी महत्वपूर्ण माहिती देताना सांगितले.

Related Posts

Leave a Comment