Home ताज्या बातम्या … अन्यथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे श्रमिक कामगार संघटनेचे २६ जानेवारी पासून आमरण उपोषण

… अन्यथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे श्रमिक कामगार संघटनेचे २६ जानेवारी पासून आमरण उपोषण

Spread the love

… अन्यथा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे श्रमिक कामगार संघटनेचे २६ जानेवारी पासून आमरण उपोषण

 


(दिशा महाराष्ट्राची / दापोली)


 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेले अस्थायी कर्मचारी वर्गाचे पगार वाढीबाबत श्रमिक कामगार संघटनेने जोर धरला आहे. संबंधित मागणी पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी २०२३ पासून आम्ही आमरण उपोषण सुरू करत असल्याचे लेखी पत्र मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष भुवड यांनी नमूद केले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना रुपये ३००/- इतकी मजुरी देण्यात येते. सुट्ट्या धरून साधारणपणे महिन्याची वीस दिवसच कार्यालय चालू असते त्यामुळे रुपये ६०००/- इतक्या तुटपुंजा वेतनावर काम करावे लागत आहे.

दररोज वाढत चाललेल्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवणे खूपच जिकरीचे होत चालले आहे असे ही पत्रकात म्हटले आहे.

आपल्या विद्यापीठांमध्ये अनेक रोजंदारी मजूर हे कुशल कामगारांचे काम करत आहेत. त्यांना अकुशलचे रोजंदारी मिळत आहे. परंतु सदर विद्यापीठांमध्ये कुशल कामगारांना रोजदारी रुपये ६३२/- इतका दर काही विभागांमध्ये देण्यात येतो. हा दर विद्यापीठातील सर्वच विभागांना लागू करण्यात यावा अशी मागणी संबंधित संघटनेद्वारे करण्यात येत आहे.

मागील अधिवेशनात सुद्धा सदर विषयावर भाष्य करण्यात आहे होते. दापोलीचे आमदार यांना सुद्धा कल्पना दिली होती मात्र आजतागायत त्यावर काहीही बदल न झाल्याने शेवटी नाराज होऊन आमरण उपोषणाची वेळ या अस्थायी कर्मचाऱ्यांवर आली आहे. याच विद्यापीठातील इतर विभागाप्रमाणे रुपये ६३२/- इतका मजुरी दर तात्काळ मिळण्यात यावा अन्यथा दिनांक २६ जानेवारी २०२३ पासून आमरण उपोषण अवलंब करावा लागेल असे संघटनेद्वारे कळविण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment