नागपूरच्या मलाशा चव्हाण यांना विश्व समतेचा कलाभूषण पुरस्कार जाहीर
(दिशा महाराष्ट्राची / नागपूर)
विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर, रत्नागिरी या संस्थेकडून राज्य स्तरीय पुरस्कारासाठी नागपूरच्या मलाशा चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
विश्व समता कलामंच लावले संगमेश्वर या संस्थेकडून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांना दरवर्षी सन्मानित केले जाते. इंटरमिजिएट व ऐलीमेंट्री उत्तीर्ण असणाऱ्या मलाशा या सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
सदर पुरस्कार वितरण सोहळा शुभगंधा लोवले येथे दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ ला अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पुरस्कारबाबत संस्थेचे संस्थापक मनोज जाधव सरांचे चव्हाण यांनी विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या ह्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.