प्रबळ इच्छाशक्ती, कौशल्य विकास आणि शिक्षण हाच यशाचा खरा मार्ग- श्री. गोविंदअण्णा केंद्रे
(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)
‘‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्याषिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावीत. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे असे प्रतिपादन माजी आमदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. गोविंदअण्णा केंद्रे यांनी केले. ते येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांनी भूषविले. यावेळी समाजसेवक महेशभाई गणवे, संस्थेचे सहकार्यवाह श्री. विश्वदास लोखंडे, सहकोषाध्यक्ष श्री. सुनिल मेहता, श्री. संतोष चव्हाण, श्री.उदय भागवत, श्री. वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. गोविंदअण्णा केंद्रे म्हणाले की महाविद्यालयातील विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे कौतुक पाहून मी खूपच भारावून गेलो आहे. शिक्षण हे माणसाला माणूस बनविते, व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे. शिक्षणाबरोबरच माणसाजवळ नम्रता, कृतज्ञता असली पाहिजे. यामुळेच माणूस मोठा होतो. लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी नेता कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. गोरगरीबांचा आधारस्तंभ, धडाडीचा व पदाला न्याय देणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. एका ऊसतोड कामगाराच्या गरीब घरात जन्मलेल्या मुंडेसाहेबांनी सर्वोत्तम साखर कारखाना उभारुन गोरगरीबांची सेवा केली. त्यांचा आदर्श युवकांनी डोळयासमोर ठेवावा.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विष्णू जायभाये यांनी करून दिला. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी संस्था व महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कार्याचा व वाटचालीसा थोडक्यात आढावा घेतला यावेळी वार्षिक अहवाल डॉ. शामराव वाघमारे, कनिष्ठ क्रीडा अहवाल प्रा. अशोक कंठाळे, वरिष्ठ क्रीडा अहवाल डॉ. मुकेश कदम व शैक्षणिक अहवाल वाचन डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी केले. यावेळी विविध क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रांत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वरिष्ठ विभागातून प्रणय सावंत व साक्षी दुर्गवले तर कनिष्ठ विभागातून करण चव्हाण व पूजा मानकर यांना आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री. विश्वदास लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विशेष अतिथी श्री. महेशभाई गणवे यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील कला गुण जोपासावेत व आत्मचिंतन करावे. तरच जीवनात यशस्वी होता येईल. प्रबळ आत्मविश्वास व शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे. यावेळी विद्यार्थी मंडळ सचिव नुपूर लांबे हिने विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था व महाविद्यालय नेहमीच आमच्या पाठीशी असते असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्था अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या विकासामध्ये सर्व घटकांनी प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी हे महाविद्यालय किर्तीवंत व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्रावीण्य कौतुकास पात्र आहे, पण या यशाचा आलेख कसा वाढत जाईल, यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडणगड तालुका भगवानबाबा मित्र मंडळ यांच्या वतीने मा.श्री. गोविंदअण्णा केंद्रे व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. विष्णू जायभाये, डॉ. मुकेश कदम, डॉ. पुरुषोत्तम पिलगुलवार, डॉ. ज्योती पेठकर, प्रा. ज्ञानेश्वर गिते, श्री. भास्कर जायभाये यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी विद्याथ्र्यांच्या विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक मा. आदेश मर्चंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.