Home क्रीडा मंकर संक्राती सणानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशन व आपला आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पनवेलमध्ये पतंग स्पर्धेचे आयोजन

मंकर संक्राती सणानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशन व आपला आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पनवेलमध्ये पतंग स्पर्धेचे आयोजन

Spread the love

मंकर संक्राती सणानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशन व आपला आधार फाउंडेशन संस्थेतर्फे पनवेलमध्ये पतंग स्पर्धेचे आयोजन

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

सिमेटच्या जंगलात मुलांना निसर्ग हिरवे सौंदर्य पहायला मिळणे म्हणजे कठीणच. आल्हाददायक वातावरणात पतंग उडविण्याची मजा काही औरच असते. याच हेतुने येत्या १४ व १५ जानेवारीला मंकरसंक्रातीच्या सणाच्या निमित्ताने पनवेल मध्ये पतंग स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पत्रकार मित्र असोसिएशन व आपला आधार फाउंडेशन या संस्थेतर्फे जामा मस्जिद प्लाँट पनवेल तहसील आँफिजवळ असणाऱ्या विस्तीर्ण जागेत बालबच्चेसांठी पतंग स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ जानेवारी ला दुपारी तीन ते संध्याकाळी सात दरम्यान होणार आहे. रात्री आसमंतात सुमारे पाचशे आकाश कंदीलचा झगमगाट होणार आहे.

आजकाल मैदानी खेळ मागे पडू लागले असुन लहानपणी पतंग उडवली नसेल अशी व्यक्ती अपवादात्मक असेल. आजच्या काळामध्ये पनवेल मध्ये मैदानाची वानवा असल्याने मैदानी खेळ देखील खेळण्यासाठी खेलाडूना इतरत्र जावे लागते. त्याच अनुषंगाने लहान मुलांसाठी पतंग स्पर्धा आयोजित केली असुन मंकर संक्रातीच्या दिवशी आकाशामध्ये पतंगच पतंग उडत असतात हिच आपली संस्कृती कायम राहावी या हेतुने या स्पर्धा भरवल्या आहेत अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार केवल महाडीक यांनी दिली.

आधिक माहीती साठी रहीम शेख 9768686980/ 9920213435 यावर संपर्क साधावा. तसेच नोदणी करण्यासाठी 8422979764 संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment