सुप्रसिध्द कवयित्री गीतांजली वाणी यांच्या काव्यांगी या अष्टाक्षरी कवितासंग्रहास स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार जाहीर
( दिशा महाराष्ट्राची / ठाणे )
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे गेल्या दहा वर्षांपासून देण्यात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कविता संग्रहाना दरवर्षी स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कारासाठी विविध दिग्गज कवी, कवयित्री समवेत कवयित्री गीतांजली योगेश वाणी यांच्या स्वरचित अष्टाक्षरी काव्यांगी या कविता संग्रहास पुरस्कार जाहीर झाला आहे.
सौ. गीतांजली योगेश वाणी ह्या सुप्रसिद्ध शीघ्र कवयित्री, लेखिका, शैक्षणिक, सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या उच्चशिक्षित महिला आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे – मुंबई प्रदेश अंतर्गत उत्तर मुंबई अध्यक्षा आहेत. साहित्यिक क्षेत्रात कोरोना काळात त्यांनी अनेक उपक्रम, स्पर्धा यात उत्कृष्ट असे यश मिळविले आणि काही पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. सातत्याने ओघवत्या शैलीतून विविध विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिध्द होत असते, तथा नानाविध ओनलाइन साहित्यिक उपक्रम राबवून त्यांनी साहित्यिक घडविण्यात उत्तम कामगिरी बजावली. शब्दशिल्प कलाविष्कार संघ नोंदणीकृत साहित्यिक समूहाच्या कार्याध्यक्षा आहेत. काव्यांगी हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह अष्टाक्षरी काव्यप्रकारातला आहे.
काव्यांगीचे प्रकाशन सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील, आणि नामांकित प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते नासिक येथेच झाले होते आणि नासिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा असा प्रेरणादायी स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार काव्यांगी संग्रहाला मिळणे कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र मधून कवयित्री सौ. गीतांजली योगेश वाणी यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.