गोरेगाव पुर्व येथे राष्ट्रीय महानायिकांची संयुक्त जयंती महोत्सव संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
मुंबईतील गोरेगाव (पुर्व) मधील नागरी निवारा वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता अधिष्ठान आणि महिला मंडळ यांच्या वतीने माता यशोधरा, राजमाता जीजाऊ, लोकमाता अहिल्याबाई होळकर, माता सावित्रीमाई फुले, फतिमा शेख, माता भीमाई आणि माता रमाई या राष्ट्रीय बहुजन महानायिकांच्या क्रांतीकारी विचारांची संयुक्त जयंती महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कुंदा प्रमिला निलकंठ उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला रामचंद्र कदम, शेषराव जाधव, वसंत यादव, हिंदुराव वाडते, मनोहर कापसे, सुरेंद्र मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाची सुरवात आदर्श महानायिकांच्या प्रतिमांचे पुजन व स्वागत गीत सादर करुन करण्यात आली तसेच मान्यवर आणि विद्यार्थांची भाषणे झाली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे उपस्थित महिलांनी महानायिकांच्या जीवनावर पोवाडे आणि सावित्रीमाईंच्या ओव्या गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद अर्चना पवार यांनी भूषवले तसेच ज्योती मोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक मांडले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वीणा पवार यांनी केले व शेवटी अंजली कांबळे यांनी या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करुन अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.