तळवली प्रशालेचे मुख्याध्यापक बसवंत थरकार यांना राष्ट्रचेतना गौरव पुरस्कार प्रदान
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गुहागर तालुक्यातील तळवली न्यु इग्लिश स्कुल प्रशालेचे मुख्याध्यापक बसवंत थरकार यांना राष्ट्र चेतना पुरस्कार २०२२ हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याच्यावतीने सानेगुरुजी यांच्या जयंती निमित्त हा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तळवली येथील न्यु इग्लिश स्कुल या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले बसवंत थरकार यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवुन शाळेचे तसेच तळवली गावाचे नाव उंचावले आहे.
करोना महामारीत सुध्दा जनजागृती तसेच कविता सामाजिक लेखन त्याचबरोबर पञकारितेच्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडत आपले सामाजिक काम चालु ठेवले. त्याचप्रमाणे त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार ही मिळालेले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांनी बसवंत थरकार यांचा राष्ट्र चेतना पुरस्कार २०२२ने गौरव केला. या पुरस्काराबद्दल बसवंत थरकार यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.