Home शैक्षणिक वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये ६ जानेवारीपासून `युन्योया’ महोत्सव

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये ६ जानेवारीपासून `युन्योया’ महोत्सव

Spread the love

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये ६ जानेवारीपासून `युन्योया’ महोत्सव

 


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)


 

आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या `युन्योया’ महोत्सवाचे शानदार आयोजन ६ ते २१ जानेवारी २०२३ या कालावधीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव म्हणजे सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थाने पर्वणी ठरणार आहे. तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही मोठी पर्वणी राहिल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आंतरमहाविद्यालयीन संगीत, नृत्य, फॅशन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान, व्याख्याने असे या महोत्सवाचे स्वरुप आहे. त्यासाठी अनेक पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी निमंत्रित केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सरचिटणीस ऍड. आप्पासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव शीव येथील संस्थेच्या संकुलात होत आहे.

यासाठी सोहम शिंदे, भूमिका सैनी, स्मित पवार, रोहन काटकर तसेच आर्यन गांगुर्डे हे विद्यार्थी संचालक मंडळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९३२६०८९५४९, ९९८७९८३५५५

Related Posts

Leave a Comment