Home सामाजिक कोकण नगर रहिवाशी संघ सलग्न: युवा संघ वतीने रुग्णसेवक मनोज डाफले सन्मानित

कोकण नगर रहिवाशी संघ सलग्न: युवा संघ वतीने रुग्णसेवक मनोज डाफले सन्मानित

Spread the love

कोकण नगर रहिवाशी संघ सलग्न: युवा संघ वतीने रुग्णसेवक मनोज डाफले सन्मानित

 


[ दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे ]


 

गेली १३ वर्षे कोकण नगर रहिवासी संघ सलग्न: युवा संघ ( विरार) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक,कला,क्रीडा क्षेत्रातअविरतपणे कार्यरत असून, कोकण नगर रहिवासी संघ सलग्न युवा संघ (विरार) वतीने गोरगरीब विध्यार्थ्यांच्या मदतीकरिता रविवार दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी जीवदानी मंगल कार्यालय मोरेश्वर विद्यालय, नालासोपारा- पूर्व येथे दिनदर्शिका- २०२३ प्रकाशन सोहळा व शाहीर विनोद फटकरे निर्मित कोकणची बहुप्रिय लोककला “नमन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असलेल्या व्यक्तींचा विशेष गुणगौरव सत्कार करण्यात आला. गुहागर तालुक्यातील चिंद्रावले गावचे सुपुत्र सामजिक कार्यकर्ते मनोज डाफले यांचा सामजिक तसेच वैद्यकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “रुग्णसेवक” म्हणून सन्मानित करण्यात आले.

भाजपा मोर्चा अध्यक्ष (उत्तर-रत्नागिरी) तसेच समाजसेवक संतोष जैतापकर यांचे मनोज डाफले हे एक विश्वासू निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. संतोष जैतापकर यांच्या सहकार्याने पालघर, वसई- विरार नालासोपारा, मुंबई आणि मुंबई उपनगर ठिकाणी कोरोना काळात वैद्यकीय टीम स्थापित करण्यात आली असून गुहागर तालुका मा. आमदार विनय नातू, संतोष जैतापकर, काशीराम पाष्टे, संदिप खैर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वैद्यकीय टीम मध्ये मनोज डाफले आणि त्यांचे सहकारी गोरगरीब जनतेच्या संकट काळी मदतीसाठी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अनेक गोरगरीब जनतेसाठी ते देवदूत ठरत आहेत. अनेक रुग्णांना हॉस्पिटलची येणारी भरमसाठ बिलं कमी करून दिलासा देण्याचे काम मनोज डाफले आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

मनोज डाफले यांचा हा “सन्मान “असंख्य मुबंईकर चाकरमानी, नालासोपारा वसई विरारकरांना दिलासा देणारा आहे. या प्राप्त सन्मानाबद्दल मनोज डाफले यांचे समाजातून सर्वस्तरातू अभिनंदन सह कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment