Home सामाजिक गुहागर तालुक्यातील सर्वसामान्यांचा आधारवड हरपला समाजसेवक- भास्कर मोरे यांचे दुःखद निधन

गुहागर तालुक्यातील सर्वसामान्यांचा आधारवड हरपला समाजसेवक- भास्कर मोरे यांचे दुःखद निधन

Spread the love

गुहागर तालुक्यातील सर्वसामान्यांचा आधारवड हरपला समाजसेवक- भास्कर मोरे यांचे दुःखद निधन

 


(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे)


 

गुहागर तालुक्यातील पिंपर गावचे सुपुत्र गोरगरीबांचे कैवारी, उत्कृष्ट संघटक, जेष्ठ समाजसेवक- भास्कर मोरे यांचे सोमवार दि. २ जानेवारी २०२३ रोजी पहाटे २.३० वा. वयाच्या ७८ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबई अंधेरी वर्सोवा, आराम नगर येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

स्मित भाषी, अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे कुशल संघटक, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सतत वावरणे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे, वेळप्रसंगी राजकारणी मंडळींकडे किंवा शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी गुहागर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यात ते सतत पुढाकार घेत अनेक लोकहिताची व लोकोपयोगी कामे करून घेण्यात स्व. भास्कर मोरे नेहमी अग्रेसर असायचे.त्यांच्या निधनाने सर्व सामान्यांना न भरून येणारी एक खोल दरी निर्माण झाली आहे.

स्व. भास्कर मोरे यांचे अनेकांशी घरोब्याचा आणि मैत्रीचा संबध होते. त्यांच्याच पुढाकाराने गुहागर- वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना एकत्र संघटीत करून खास मुबंई पश्चिम उपनगरातील मुंबईकर चाकरमान्यांच्या सोयीसाठी १९९७ साली चिपळूण डेपोची नरवण – बोरिवली एस. टी. बस. सुरू करून सदर एस. टी. कायम स्वरूपी चालू रहावी यासाठी एस. टी. मार्गावरील सर्व गावांतील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली नरवण – बोरिवली एस. टी. संघटना स्थापन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

स्व. भास्कर मोरे यांची लोकप्रियता गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वाढता पाठींबा लक्षात घेऊन तालुक्यातील व्यापक कामे करण्यासाठी त्यांच्याच अध्यक्षतेखाली गुहागर तालुका लोकसेवा संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, क्षेत्रात लोकोपयोगी कामे संघटनेच्या माध्यमातून मार्गस्थ झाली.

मोरे यांचे सहकारी मित्र तसेच गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे सचिव तथा ग्रामपंचायत उमराठचे सरपंच-जनार्दन आंबेकर यांनी गुहागर तालुक्यातील सर्वसामान्यांचा “आधारवड” हरपला असल्याचे दुःख व्यक्त केले. स्व. भास्कर मोरे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारांना प्रचंड धक्काच बसला आहे. त्यांच्या कुटूंबिंयांवर आणि मोरे परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळलं आहे. त्यांच्या दुखाःत आम्हीही त्यांचे सर्व सहकारी मित्रपरिवार सहभागी आहोत. या ओढवलेल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी धैर्य, ताकद, आत्मविश्वास त्यांच्या कुटुंबीयाना लाभो तसेच कै. भास्कर मोरे यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच गुहागर तालुका लोकसेवा संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांच्यावतीने ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना आणि भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहोत.

Related Posts

Leave a Comment