Home शैक्षणिक जि. प. प्रा. आदर्श मराठी शाळा कर्दे येथील समृद्धी रुके हिची नवोदय विद्यालयात निवड

जि. प. प्रा. आदर्श मराठी शाळा कर्दे येथील समृद्धी रुके हिची नवोदय विद्यालयात निवड

Spread the love

जि. प. प्रा. आदर्श मराठी शाळा कर्दे येथील समृद्धी रुके हिची नवोदय विद्यालयात निवड


दिशा महाराष्ट्राची / दापोली

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे या शाळेतील विद्यार्थ्यांची सलग तीन वर्ष नवोदय विद्यालयात निवड होत आहे. याही वर्षी इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी समृद्धी दिनेश रुके हिने उज्वल यश संपादन केले आहे. तिची निवड पडवे तालुका राजापूर येथील नवोदय विद्यालय येथे झाली आहे.

समृद्धी दिनेश रुके या विद्यार्थिनीस वैजयंत वसंत देवकर यांचे उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रुके यांची ही द्वितीय कन्या असून आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून समृद्धी सुद्धा नवोदय विद्यालयात प्रवेश करणार आहे.

समृद्धी रुके हिच्या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रुके, उपाध्यक्ष सुशील मळेकर तसेच सर्व सदस्य, मुख्याध्यापक अनिल कुमार मळगे, सुशांत केळसकर स्वप्नील परकाळे यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण पंचक्रोशीत समृद्धीचे कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment