Home शैक्षणिक माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन तर्फे पंचनदी लर्निंग सेंटरचा भव्य शुभारंभ श्री. अमोल गोरे यांच्या हस्ते संपन्न

माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन तर्फे पंचनदी लर्निंग सेंटरचा भव्य शुभारंभ श्री. अमोल गोरे यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन तर्फे पंचनदी लर्निंग सेंटरचा भव्य शुभारंभ श्री. अमोल गोरे यांच्या हस्ते संपन्न



दिशा महाराष्ट्राची/ दापोली-

श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रशालेच्या जुन्या इमारतीत मंगळावर दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन मार्फत पंचनदी लर्निग सेंटर चे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. शिवप्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळा सन्मा.श्री.अमोल गोरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागरी पोलीस ठाणे, दाभोळ यांच्या शुभ हस्ते दिमाखदार व रंजकदारपणे पार पडला.

पंचनदी लर्निग सेंटर दालनाच्या उद्घाटनानंतर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत मनमोहक सुरात गावून कार्यक्रमाची मधुर सुरुवात केली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

जि.प.पू.प्रा.ज्ञानदीप विद्यामंदिर मराठी शाळा पंचनदी या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी दुर्वा मयेकर,इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत झळकल्यामुळे लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी व श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी यांतर्फे कार्यक्रम प्रसंगी सत्कार करून गौरविण्यात आले.

श्री. अमोल गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभोळ यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल व संस्काराबद्दल समाधानी असल्याचे म्हटले. ग्रामीण भागात विद्यार्थीरूपी रानफुलांसाठी पंचनदी शाळेचे चाललेले प्रयत्न अतिशय प्रेरणादायी आहेत. समोर बसलेली रानफुले शहरातील जाई , जुई, चमेली , मोगरा (शहरातील विद्यार्थी) यांना सरस ठरतील तसेच स्व:भविष्याबरोबरच देशाचे समृद्ध, संपन्न नागरिक बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंचनदी लर्निंग सेंटर नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्वाचे पाऊल ठरेल असेही मत त्यांनी व्यक्त केले.

सौ. मृदुला निंबकर यांनी विद्यार्थ्यांचे गुणगान गौरवून पोलीस दल महिला व मुलींच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसहित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सलामी देऊन पोलीस दलाचा आदर केला. तसेच सौ. मृदुला निंबकर यांनी आपल्याकडून लागणाऱ्या मदतीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. सुनिल देसाई सर यांनी आपल्या मनोगतात पंचनदी लर्निग सेंटर चे महत्त्व व मोबाईल पासून दूर राहून शारीरिक हालचाल, व्यायाम महत्वाचे असल्याचे नमूद केले. लहान मुलांसाठी शारीरिक व बौद्धिक विकासासाठी अनेक खेळातून मनोरंजनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत हे सांगितले. सकाळी एक तास व सायंकाळी एक तास खेळ खेळल्याने शारीरिक व बौद्धिक विकास होणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

श्री. विनायक जाधव यांनी शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी जाणीवपूर्वक अभ्यास करताना दिसून येतो व ग्रामीण भागातच उत्तम शिक्षण दिले जाते असे स्पष्ट केले. सौ. संकल्पा शिंदे सरपंचा पंचनदी ग्रुप ग्रामपंचायत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक केले. श्री. दिलीप बांद्रे (गाव- आसूद) यांनी इयत्ता 9 वी च्या विद्यार्थिनींनी गायलेले सुरेल आवाजातील ईशस्तवन व स्वागत गीत यांचे मनःपूर्वक कौतुक केले व पंचनदी लर्निग सेंटर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तालुकाभर माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या कामाचे गौरवात्मक आदर व्यक्त केला.

सौ.अश्विनी गायकवाड मॅडम ( शाळा – पंचनदी मराठी ) यांनी मुलांच्या उजव्या व डाव्या मेंदूच्या परिपूर्ण वाढीसाठी व विकास साधण्यासाठी पंचनदी लर्निंग सेंटर उपयुक्त असल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन ने सुरू केलेल्या पंचनदी लर्निंग सेंटरचा खरा उपयोग आमच्या मराठी शाळेतील लहान विद्यार्थ्यांना होणार असल्याचे सांगून आमचे विद्यार्थी अजून प्रगतशील होतील असा विश्वास व्यक्त केला.

श्री.आशुतोष साळुंखे सर यांनी मन, मनगट व मेंदू यांच्या विकासासाठी पंचनदी लर्निग सेंटर उपयुक्त असून माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन यांचे आभार मानत श्री. अविनाश चौहान सर व श्री. सुनिल देसाई सर यांच्या दीड वर्षाच्या कालावधीतील कार्याचा चढता आलेख वाचला. त्यामुळे लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी या संस्थेमार्फत श्री.अमोल गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभोळ यांच्या हस्ते श्री.अविनाश चौहान सर व श्री. सुनिल देसाई सर यांचा यथोचित सत्कार केला.

पंचनदी लर्निंग सेंटरच्या दालनाचे उद्घाटन प्रसंगी श्री. अमोल गोरे- सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभोळ, सौ. संकल्पा शिंदे- सरपंचा ग्रुप ग्रामपंचायत पंचनदी आघारी बोरीवली, श्री. अविनाश चौहान- माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, श्री. सुनील देसाई- माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट तथा माजी मुख्याध्यापक पंचनदी हायस्कूल तथा विद्यमान संचालक पंचनदी, श्री.हरिश्चंद्र ( बंधू ) कुटरेकर- अध्यक्ष लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी, श्री. सुंदर राणे – माजी पंचायत समिती सदस्य, श्री.पंढरीनाथ (नाना) जावळे- सदस्य लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी, श्री.अनंत (दादा) कुटरेकर- विश्वस्त लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी, श्री. दिलीप बांद्रे व श्री. प्रकाश शिर्के (आसूद), श्री. कृष्णा दौलत बडबे (करजगाव ), श्री.संजय गोरीवले ( देवके ), श्री.बाळासाहेब देसाई ( कोल्हापूर ), श्री.शांताराम उसरे (चिखलगाव ), श्री. गणेश कादवडकर व श्री. खोपडकर (पोलीस दाभोळ ), श्री. सागर मरकड सर व सौ. अश्विनी गायकवाड मॅडम (पंचनदी मराठी शाळा), सौ. विभावरी गमरे मॅडम (रामराजे कॉलेज, पंचनदी), सौ. निर्मला निमकर (दाभोळ), श्री. विनायक जाधव (पंचनदी ), श्री. आशुतोष साळुंखे सर, सौ. शुभदा वैशंपायन मॅडम व श्रीम. सुजाता जोगळेकर मॅडम, सौ. अपूर्वा धाडवे, श्री. प्रशांत जोशी, श्री.सुनिल पाते ( पंचनदी ), श्रीम. भूमी मॅडम – अधीक्षिका वाशिष्ठी कन्या छात्रालय , श्रीम.चारुलता शिंदे, कार्यक्रम वृत्तांकन करण्यासाठी कोंकण की दुनिया यूट्यूब चे संचालक श्री.नजीर मुल्ला सपत्नीक कार्यक्रमाला उपस्थित होते.

तसेच जि.प.पू.प्रा.ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी, श्री.यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी आणि रामराजे कॉलेज पंचनदीचे सर्व विद्यार्थी, अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.सर्व थरातून माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टचे सन्मा.श्री.अविनाश चौहान व श्री. सुनिल देसाई सर यांचे कौतुक होत आहे. श्रीम. शुभांगी महाडीक यांनी भोजन स्वादिष्ट बनविले.

माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट व पगारीया वेल्फेअर फाउंडेशन मार्फत पंचनदी लर्निंग सेंटरच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आशुतोष साळुंखे सर यांनी केले. प्रमुख पाहुणे, मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक यांचे आभार मानून माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

Leave a Comment