Home सामाजिक क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न

ग्राम महसूल अधिकारी आबलोली कार्यक्षेत्रातील नागरीकांनी घेतला लाभ 

Spread the love

क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प आबलोली येथे उत्साहात संपन्न



(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम)-


 

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली आबलोली येथे तहसीलदार कार्यालय गुहागर, उपविभाग चिपळूण, मंडळ आबलोली यांचे संयुक्त विद्यमाने मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर ,ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १) क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा, २) ॲग्रीस्टॅक नोंदणी कॅम्प नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी आबलोली कार्यक्षेत्रातील नागरीकांनी लाभ घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या स्वागता नंतर आबलोलीचे ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी यांनी “महसूल विभागा मार्फत देण्यात येणारे विविध दाखले,” “संजय गांधी श्रावणबाळ पेन्शन योजना”,”ॲग्रीस्टॅक योजना”, “पीडिइं” म्हणजे पब्लिक डेटा इंट्री आदी. विषयांवर मौलिक मार्गदर्शन करुन “ॲग्रीस्टॅक” योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनीही मार्गदर्शन केले नंतर नविन रेशनकार्ड, ७/१२ तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी फॉर्म वितरण, संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज स्विकारण्यात आला.व दाखले मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

 

यावेळी व्यासपीठावर आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, केंद्र शाळा आबलोलीचे मुख्याध्यापक राजदत्त कदम, पत्रकार संदेश कदम, ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, पोलिस पाटील महेश भाटकर, सीएससी सेंटर चालक नरेश निमूणकर, शिवणेचे ग्राम महसूल अधिकारी शुभम जाधव, शीरचे ग्राम महसूल अधिकारी गौतम गवळे, भातगावचे ग्राम महसूल अधिकारी आकाश बरकडे, कुडलीचे ग्राम महसूल अधिकारी शुभम पिटले आदी. मान्यवर उपस्थित होते. हा कॅम्प यशस्वीतेसाठी महसूल सेवक प्रकाश बोडेकर, मंगेश पागडे, सुमेध पवार यांनी प्रयत्न केले.

Related Posts

Leave a Comment