आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन
दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम)-
राज्य घटनेचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अतिशय आनंद होत असून भारतीय जनतेच्या जीवनाशी निगडित असलेली राज्यघटना तिच्याविषयी आपण जागृत राहिलो तरच भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र बनवू शकतो. त्याकरिता घटनात्मक मूल्यांची जोपासना करुन त्याचे संवर्धन करावे या उदात्त हेतूने” अमृत महोत्सव” वर्ष साजरा करण्याचा संकल्प करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा (रजि.) शाखा तालुका गुहागर आणि रयत लोक संघटन यांचे संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०२:०० वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंत मोहिते हे भूषविणार असून या जाहीर सभेचे प्रास्ताविक काशिनाथ सुर्वे हे करणार असून या जाहीर सभेला “भारतीय संविधान अमृत महोत्सव” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून एस. एल. सुर्वे, बबन कदम हे मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.
भारतीय संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमाला बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, माजी अध्यक्ष विजू आप्पा कदम, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे मुंबईचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, आनंदवन बुद्ध विहार आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, चिटणीस अविनाश कदम आदी. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सुर्वे हे करणार आहेत.
तरी गुहागर तालुक्यातील जनतेने या संपूर्ण कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर ,रयत लोक संघटन यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.