उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली अंतर्गत ग्राम. पिपळगाव, लाखांदूर येथे व्यसनमुक्ती जनजागृती मार्गदशन
दिशा महाराष्ट्राची/ भंडारा –
शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था, भंडारा द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोली अंतर्गत पिपळगाव ता. लाखांदूर येथे 26/01/2025 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यसनमुक्ती जनजागृत्ती करण्यात आली.
जनजागृती शिबिराचे आयोजन करून व्यसनमुक्त समाज निर्मिती कशी होईल या बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम, मृत्युदर प्रमाण, तरुण व्यसनात कसे गुरफटत चालेले याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी मुखतः पिपळगाव येथील सरपंचा मा. अस्मिता ताई लांडगे, व संपूर्ण ग्राम पंचायत सदस्य आणि व्यसनमुक्ती केन्द्राचे संपूर्ण कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले, व्यसनमुक्ती बद्दल माहिती देऊन त्यांना माहिती पत्रक देण्यात आले.
या जनजागृत्ती कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. गंगाधर धुवाधपारे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. शिलवंत घोडेस्वार, प्रकल्प संचालिका सौ. उषा घोडेस्वार, जयश्री चिमणकर (नर्स), व संपूर्ण ग्रामवाशी भरगच्च संख्येने उपस्थित होते.
सौ. उषा घोडेस्वार यांनी व्यसनमुक्ती बाबत प्रबोधन करून व्यसनामुळे कुटुंब व समाजात प्रतिष्ठा कशी नाश पावत आहे हे सांगितले. व्यसनी लोकांना व्यसनमुक्ती केंद्राची गरज का आहे याचे महत्व पटवून दिले. काही ग्रामवासियांनी व्यसणामुळे होणारे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. आरोग्य व व्यसनमुक्त जीवन असा संदेश उपस्थितांना देण्यात आला. सर्वांच्या सहकार्याने हा जनजागृत्ती कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ रित्या पार पाडण्यात आला.