Home सामाजिक निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आबलोली येथे आज “महारक्तदान” शिबीर आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन”

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आबलोली येथे आज “महारक्तदान” शिबीर आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन”

Spread the love

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे वतीने आबलोली येथे आज “महारक्तदान” शिबीर आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन”



दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम) –


 

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व निस्वार्थी समाज सेवक, आबलोली गावाचे सुपुत्र आणि”  जिवनदाता”, “आबलोली भूषण पुरस्कार”  असे अनेक पुरस्कार प्राप्त ज्यांनी आपल्या आयुष्यात आता पर्यंत ९९ वेळा रक्तदान केले आहे आणि आयुष्याच्या ६५ व्या वर्षी दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी स्वत:च्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदानाची शतक पूर्ती साजरी करणारे व अनेकांना जिवदान देणारे व आबलोली गावाचे नाव,गुहागर तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेणारे रक्तदाते विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतक पूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते ०१:०० या वेळेत “महारक्तदान” शिबिराचे आयोजन केले असून या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी बहूसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी केले आहे.

तसेच गुहागर तालुक्यातील आबलोली गावचा बहुमान,राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन ज्यांना गौरवण्यात आले असे प्रगतशील शेतकरी एस. के. 4 हळदीच्या वाणाचे प्रणेते आणि उद्योजक आबलोली गावाचे नाव, गुहागर तालुक्याचे नाव देशभर उच्चस्थानी नेणारे आबलोली गावाचे सुपुत्र सचिनशेठ कमलाकर कारेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “आबलोली भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत करण्यात येणार आहे.

“महारक्तदान” शिबीर आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सचिनशेठ कारेकर यांच्या गारवा गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रम सोहळ्याला गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, माजी सभापती आणि शिक्षण महर्षी चंद्रकांतशेठ बाईत आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने या “महारक्तदान” शिबीराला आणि “आबलोली भूषण” पुरस्कार वितरण सोहळ्याला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे सरपंच, उपसरपंच, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Related Posts

Leave a Comment