शिवसेनाप्रमुख स्मृती क्रिकेट चषकाचा विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ
दिशा महाराष्ट्राची/ आबलोली (संदेश कदम)-
हिंदूहृदय सम्राट वंदनिय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजक सचिन कोंडविलकर, गुड्डू सुबेदार , प्रज्योत जोयशी , प्रविण पवार व मित्रपरिवारतर्फे ओव्हर आर्म क्रिकेट टेनिस चेंडू सहाव्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा जानवळे बौद्धवाडी मैदानावर नुकतीच संपन्न झाली.
श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेत विजेता विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघ व उपविजेता सुबहान शृंगारतळी क्रिकेट संघ ठरला. विजेत्या क्रिकेट संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम १५११५ व उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम १११११ रू. चे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या गौरव समारंभासाठी मान्यवर म्हणून जानवळे गावच्या सरपंच सौ.जान्हवी विखारे, रमेश धामणस्कर, अर्जुन शितप, जानवळे ग्रा. पं. सदस्य मुबीन ठाकूर, आयोजक सचिन कोंडविलकर , पत्रकार निसारखान सरगुरो , दिनेश चव्हाण , सुरेश आंबेकर , सामाजिक कार्यकर्ते अजय खाडे , विजय जानवळकर , पिंट्या संसारे, सुदीप तुप्ते , नथुराम जानवळकर , राकेश रहाटे , संतोष शितप , अंतिम संसारे आदी. मान्यवर उपस्थित होते.
आयोजकांतर्फे मान्यवरांचा शाल , सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सदरच्या ओव्हर आर्म क्रिकेट टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये १६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्या विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघाला रमेश धामणस्कर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले. उपविजेत्या सुबहान शृंगारतळी क्रिकेट संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम जानवळेच्या सरपंच सौ.जान्हवी विखारे व मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. विश्वकर्मा आबलोली क्रिकेट संघातील क्रिकेटपटू शामू साळवी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज समिर उर्फ बाळू चव्हाण – सुबहान क्रिकेट संघ शृंगारतळी , उत्कृष्ट फलंदाज चेतन माने – सुबहान क्रिकेट संघ शृंगारतळी , अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर अमित पवार – विश्वकर्मा क्रिकेट संघ आबलोली यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ओव्हर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पंच म्हणून कैलास पिलणकर व बंधू मोहिते तसेच समालोचक म्हणून साईराज दाभोळकर यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले. सदरच्या स्पर्धेसाठी जानवळे गावचे नागरिक , जे. पी. एल जानवळे , गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशन , गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर तसेच सचिन कोंडविलकर मित्रपरिवार , क्रिकेट संघ , क्रिकेटपटू , प्रेक्षक यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
गौरव समारंभाचे सूत्रसंचालन जानवळेमधील सामाजिक कार्यकर्ते व क्रिकेटपटू अंतिम संसारे यांनी केले. पत्रकार निसारखान सरगुरो यांनी यंदाच्या सहाव्या पर्वातील श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती चषकाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक सचिन कोंडविलकर व मित्रपरिवार यांचे तसेच विजेत्या व उपविजेत्या क्रिकेट संघांचे अभिनंदन करून सदर स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन संपन्न झाल्याचे सांगितले.
आयोजित क्रिकेट स्पर्धेमुळे क्रिकेटपटूंना उत्कृष्ट खेळाची संधी लाभते .अनेक क्रिकेट खेळाडूंना खेळाचे कौशल्य दाखवता येते असे गौरवोद्गार व्यक्त केले . आयोजक सचिन कोंडविलकर यांनी आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी क्रिकेट संघ , मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.