Home धार्मिक निवोशीत माघी गणेशोत्सव निमित्त धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

निवोशीत माघी गणेशोत्सव निमित्त धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

निवोशीत माघी गणेशोत्सव निमित्त धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन



दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (उदय दणदणे)- 


 

माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्मकाळ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, ज्या दिवशी गणेशलहरी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी होय, या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते,तो दिवस म्हणजेच माघी गणेश जयंती होय.

गुहागर तालुक्यातील मौजे निवोशी (कातळवाडी -गणेशवाडी) वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दि ३१ जानेवारी ते रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सलग तीन दिवस धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

कार्यक्रमाची रूपरेषा 

उत्सवादरम्यान प्रतिदिवशी सकाळी ८: ३० वाजता श्री गणेशाचा अभिषेक हा धार्मिक विधी होईल, शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. श्री गणेशाची महाआरती, ११ ते ०५ वा. महिलांच्या स्पर्धा, रात्री ०८ ते ०९:३० वा. दिंडी व गणेशाची महाआरती, रात्री १० वा.भजनाचा महासंग्राम (डबल बारी) संदिप पुजारे: महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ -नाडण आणि अखिलेश फाळके: श्री पडलेकर प्रासादिक भजन मंडळ-धालवली,देवगड अशी भजनाची जुगलबंदी रंगेल, शनिवार दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वा.गणेशाची महाआरती, सकाळी ११ ते ०५ निवोशी प्रीमियर लीग (स्पर्धा), रात्री ०८ ते ०९:३० वा. दिंडी व गणेशाची महाआरती, रात्री १० वा.ग्रामस्थांचे सुस्वर भजन, रात्री १२ वा. श्री गणेशाचा जन्मकाळ, रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वा.श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२:३० वा. श्री गणेशाची आणि सत्यनारायणाची महाआरती, दुपारी ०१:३० वा. महाप्रसाद, दुपारी ०३: ३० वा. महिलांचे हळदीकुंकू, दुपारी ०४ वा. लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा,रात्री ०८ ते ०९:३० वा. दिंडी व गणेशाची महाआरती, रात्री.१० वा. जाखडी नृत्य:माऊली वरदान नृत्यकलापथ रानवी, रात्री १२ वा.ललित असे नियोजित कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

गणेश भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन मंदिर निवोशी (कातळवाडी /गणेशवाडी) वतीने करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment