Home शैक्षणिक राष्ट्रीय सेवा योजना आयोजित”ग्रामीण विकास व संस्कार शिबीर” उत्साहात संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित”ग्रामीण विकास व संस्कार शिबीर” उत्साहात संपन्न

Spread the love

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित”ग्रामीण विकास व संस्कार शिबीर” उत्साहात संपन्न



दिशा महाराष्ट्राची/ मुंबई-


 

सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे, ग्रामीण विकास व संस्कार शिबीर, दि. १८/१ ते २४/१/२०२५ या कालावधीत मु. रानसई, तालुका उरण (पनवेल) या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एकूण ५६ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक सहभागी झाले होते. या गावातील हे तिसरे शिबीर होते.

शिबिराचे उद्घाटन दिनांक १८/१/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरपंच सौ. राधा पारधी व समाजसेवक श्री. राजू मुंबईकर (महाराष्ट्रभूषण) यांच्या हस्ते, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर, प्रा. पंकज सरवदे व डॉ. विष्णू भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले व शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी रोज सकाळी तीन तासांच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छता, रस्ते डागडुजी, गवत कापणे व शून्य प्लास्टिक मोहीम यशस्वीरित्या राबवली व स्थानिक ग्रामस्थांना त्यांचे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आवाहन केले. तसेच पथनाट्याद्वारे आणि पत्रके वाटून गावातील तिन्ही वाड्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी जनजागृती केली. विशेष म्हणजे सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी व ईतर ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केलं, म्हणूनच मागील‌ दोन‌ वर्षाप्रमाणे यावर्षीही शिबीर यशस्वीरित्या राबविण्यात आले. तसेच गावातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विषयांवर चित्रकला स्पर्धा घेतली व विजेत्या मुलांना बक्षिसे वाटली.

तसेच रोज संध्याकाळी वेगवेगळ्या सामाजिक विषयावर बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंधश्रद्धा व बुवाबाजी, व्यसनमुक्ती, तरुणांची अंतर्भूत क्षमता, साप व पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयावर निमंत्रित वक्त्यांची व्याख्याने झाली. यामध्ये देखिल विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बुधवार, दि. २२/१/२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता गावातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांच्या उखाणे घेण्याचा व तिळगुळ व सोबत भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये शाळेतील मुलींसह सर्व महिलांनी उत्तम सहभाग नोंदवला. त्यानंतर सर्व ग्रामस्थांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे अशा स्वरूपाचा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. ज्यामध्ये विशेषता ‘स्वच्छ गाव स्वच्छ भारत’ व व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य, नृत्य व गाण्यांचा समावेश होता.

प्रा. विशाल करंजवकर व सौरभ गुप्ता यांनी मुलांच्या उत्तम आरोग्य व फिटनेससाठी नियमित रोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेत हलका व्यायाम, कवायती व योगाचे विविध प्रकार त्यांना शिकवले. तसेच शेवटच्या दिवशी मुला मुलींच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते.

शिबिराच्या दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व प्राध्यापक डॉ. समीर ठाकूर, डॉ. शशिकांत मुंडे, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. दिपक पगारे, प्रा. कुंदन कांबळे, प्रा. सुमेध माने, प्रा. निर्मला कांबळे, श्री. वैभव महाडीक यांनी शिबिराला भेट देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्थानिक समाजसेवक, श्री. राजू मुंबईकर, श्री मधुकर पारधी व सरपंच सौ. राधा पारधी यांनी केलेले सहकार्य खूपच मोलाचे ठरले. तसेच एन. एस. एस‌. कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे माजी विद्यार्थी सौरभ‌ गुप्ता, ऋषिकेश सौंदाळकर, सागर बनसोडे, राहुल कोदुरुपाका, विजय कांबळे, आशिष जगताप इत्यादी विद्यार्थीनी सुट्टी घेऊन जमेल तसे शिबीरात सहभागी झाले व त्यांनी मनापासून सहकार्य केले.

Related Posts

Leave a Comment