नमन लोककला संस्थेची नियोजित सभा संपन्न; लोककलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिशा महाराष्ट्राची/ रत्नागिरी (उदय दणदणे)
कोकण कलाक्षेत्रात लक्ष लागून राहिलेल्या “नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड- भारत” ह्या संस्थेची शुक्रवार २४ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण तालुका नियोजित सभा उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपस्थितीत व बहुसंख्य नमन मंडळ,लोककलावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
नमन ह्या लोककलेला राजमान्यता मिळण्याबरोबरच, कलाकारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने गतिशील कार्यपद्धतीचे धोरण निश्चित करत याच अनुषंगाने रत्नागिरी, संगमेश्वर,चिपळूण येथे नमन मंडळ व कलाकारांच्या व्यथा जाणून घेण्याबरोबरच संस्थेचा प्रसार,प्रचार व ध्येय,धोरण नमन लोककलेतील शेवटच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्यासाठी सदर सभांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासचिव शाहिद खेरटकर यांनी प्रास्तविक मनोगतातून सांगितले.
संस्थेचा आजपर्यंतचा कार्यअहवाल, विविध उपक्रमांची माहिती तसेच संस्थेच्या वतीने शासन दरबारी केलेल्या मागण्या आणि त्याला मिळालेले यश त्याचबरोबर शासन स्तरावर प्रस्तावित असलेल्या विविध मागण्या याची सविस्तर माहिती अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी उपस्थितांना दिली. त्याच बरोबर नमन लोककला संस्थेबद्दल गेले काही दिवस गैरसमज पसरवून जो काही संभ्रम निर्माण झाला होता त्याचा खरपुस समाचार घेत.नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र- भारत ही संस्था राजकारण विरहित काम करत असून नमन कलाकारांसाठी आम्ही जे आजवर काम केले आहे ते इतर कोणत्या संस्थेने किंवा व्यक्तीने केलेले नाही हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण ही संस्था पारदर्शक काम करत असून शासन स्तरावरील विविध मागण्या सत्यात उतरवण्यासाठी नमन लोककला संस्था यशस्वी झाली असून सांस्कृतिक मंत्रालयाने गतवर्षी जो नमन महोत्सव सुरू केला आहे ते यश नमन लोककला संस्थेचेच असल्याचे आपल्या मनोगतीय भाषणातून स्पष्ट करून अशा विविध मुद्यांवर सडेतोड भाष्य करत नमन मंडळ व कलाकार यांचा संभ्रम दूर केला.
सदर सभेत रत्नागिरी शाखेची बांधणी करण्यात आली असून पुढीलप्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्रकाश मालप, उपाध्यक्ष शंकर मांडवकर, सरचिटणीस ओमकार शितप, उप सचिव प्रदीप बारगुडे, खजिनदार अक्षय बारगुडे, सदस्य-रमण मालप,सहदेव वीर,तुषार बाडावटे, रूपचंद गावडे, अंकुश कळंबटे यांची निवड करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे संगमेश्वर, लांजा, चिपळूण सदर शाखा प्रास्तवित प्रक्रियेत असून येत्या काही दिवसांत ह्या शाखांची बांधणी होईल अशी अध्यक्ष रविंद्र मटकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
सदर सभेला मुंबई मध्यवर्तीचे सचिव सुधाकर मास्कर, उप सचिव तुषार पंदेरे, उपाध्यक्ष रमाकांत जावळे सदस्य संदीप कानसे, दिपक करकर, उदय दणदणे, प्रवीण कुलये, सागर डावल आदी पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर रत्नागिरी सभेला नवनिर्वाचित कार्यकारणी सल्लागार झराजी वीर (मध्यवर्ती सदस्य), गणपत मालप, प्रवीण कुलये, चंद्रकांत धोपट, रमाकांत धोपट,संगमेश्वर सभेला: यशवंत गोपाळ,पप्या बांडागळे, दिनेश बांडागळे, संतोष गुरव, प्रकाश डोंगरे,पिंट्या भालेकर, दिनेश साबळे, प्रविण टक्के, जेष्ठ कलावंत आप्पा फडकले, नितीन गोपाळ, संतोष मुंडेकर,लांजा तालुक्यातील जेष्ठ शाहीर अंकुश गुरव, तानाजी सुवारे, राजाराम फाफे, प्रमोद गाडे, राकेश गुरव, चिपळूण सभेला:निलेश साबळे, अजय यादव, वसंत पांडुरंग, भोजने, रघुनाथ रामचंद्र चोगले, एकनाथ चोगले, सुभाष लक्ष्मण चोगले, रामदास गंगाराम भोजने ,रामचंद्र सीताराम कांबळी,निलेश अनंत साबळे, विनोद भुवड ,आशिष साळुंखे आदी नमन मंडळी कलाकार उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन दिपक कारकर यांनी केले.