Home सामाजिक विमलबाई विद्यालयातील शिक्षिक जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये सन्मानित

विमलबाई विद्यालयातील शिक्षिक जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये सन्मानित

Spread the love

विमलबाई विद्यालयातील शिक्षिक जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये सन्मानित



दिशा महाराष्ट्राची/ पुणे


भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित देशातील पहिली मुलींची शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पहिले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल २०२५ मध्ये विमलाबाई लुंकड विद्यालयातील शिक्षिका फुलेप्रेमी कवयित्री कांचन मून (भरणे) हडपसर पुणे व फुलेप्रेमी कवयित्री वर्षा सतिश शिंदे गुलटेकडी पुणे या दोन शिक्षिका यांना भिडेवाडाकार कवी फुलेप्रेमी विजय वडवेराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विमलाबई लुंकड विद्यालयातील शिक्षिका संगिता भाऊ चौधरी व सुनिता किसन पवार यांनी आपल्या स्त्री शिक्षण देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा व सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कविता सादर केली. यांचा सन्मान संविधान, पेन व सन्मानचिन्ह देऊन फुलेप्रेमी कवी विजय वडवेराव सर यांनी केले. सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.

विमलबाई लुंकड विद्यालयातील मुख्याध्यापक संदिप मनोहर सातपुते यांनी व शाळेतील सर्व सहशिक्षकांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

   दिनांक २/०१/२०२५ ते ५/०१/२०२५ या कालावधीत एस एम जोशी सभागृह गांजवे चौक या ठिकाणी जगातील पहिले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल २०२५ भिडेवाडाकार कवी फुलेप्रेमी विजय वडवेराव आयोजित देशातील पहिली मुलींची शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत या फेस्टीवल चे आयोजन करण्यात आले होते. यात फुले प्रेमी शिक्षिका वर्षा शिंदे मॅडम यांनी स्वतः रचलेला भिडेवाडा देशातील पहिली मुलींची शाळा या विषयावर आधारित पोवाडा व मी सावित्री बोलते हे एकपात्री नाटक सादर करण्यात आले. सादरीकरणात इयत्ता पाचवी, सहावी व सातवी चे विद्यार्थ्यांचा सहभाग होता व फुले प्रेमी शिक्षिका कांचन मून (भरणे) यांनी सहकार्य केले.

या फेस्टीवल मध्ये शिक्षिका कांचन मून यांनी ज्ञानाई सावित्रीमाई व भारतीय मुस्लिम पहिली शिक्षिका माई फातिमा शेख यांची वेशभूषा केली होती. त्याच प्रमाणे देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाडा जिल्हास्तरीय कविसंमेलन पुणे जिल्हा कविसंमेलन,पिंपरी चिंचवड कविसंमेलन, नायगाव येथील यात हिरहिरीने सहभाग घेतला. फेस्टीवल मध्ये जगभरातून एकुण २५ फुलेप्रेमी कवी कवयित्री यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या फेस्टीवल साठी जगभरातून अनेक फुलेप्रेमी कवी कवयित्री व श्रोते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment