पाटपन्हाळे विद्यालयात हिंदी भाषा विश्व दिन साजरा
दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम) –
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षेखाली व मार्गदर्शनात हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
हिंदी भाषा विश्व दिवस कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस. चव्हाण, हिंदी विषय अध्यापिका सौ. ए. आर. चव्हाण, सौ. एस. एस. विचारे-सावंत, श्री. एस. एम. आंबेकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते श्रीसंत कबीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवर शिक्षकवृंदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका सौ.एस.एस.विचारे- सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृद्धी सुरेश आंबेकर -इयत्ता नववी हिने केले. इयत्ता पाचवी ते नववी मधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून मनोगत व हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. एस. एस. चव्हाण, कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही. डी.पाटील तसेच हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी हिंदी भाषा विश्व दिवस साजरा करण्याचा हेतू, हिंदी भाषेचे महत्व, हिंदी भाषेची ख्याती आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमासाठी मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल हिंदी विषय अध्यापिका सौ.ए.आर.चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.