Home शैक्षणिक अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे आहे.- प्रा. संदीप निर्वाण   

अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे आहे.- प्रा. संदीप निर्वाण   

Spread the love

अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे आहे.- प्रा. संदीप निर्वाण   



दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड


मंडगणड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच ‘अग्नीसुरक्षा जनजागृती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून रसायनशास्त्र विभागाचे प्रा. संदीप निर्वाण हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते. यावेळी डॉ. मुकेश कदम, डॉ. सुरज बुलाखे, प्रा.शरिफ काझी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 

सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. मुकेश कदम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

       मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. संदीप निर्वाण म्हणाले की, अग्निसुरक्षेच्या बाबतीत समाजामध्ये जागरुकता असणे खूप गरजेचे व महत्वाचे आहे. निवासी क्षेत्रे आणि कामाच्या ठिकाणापासून सार्वजनिक जागांपर्यंत आग कोठेही लागू शकते. ज्यामुळे अनेकदा जीवितहानी, मालमत्तेचे मोठे नुकसान आणि पर्यावरणाचा नाश यासारखे विनाशकारी परिणाम आपणास दिसून येतात. अग्निसुरक्षा शिक्षण हे संभाव्य धोके ओळखण्यास आणि सावधगिरीचे उपाय अवलंबण्यासाठी उपयोगी पडते. आग स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी तीन आवश्यक घटक म्हणजे उष्णता, इंधन आणि आक्सिजन होय. अग्निसुरक्षा कार्यशळा ही आगीशी संबंधित दुर्घटना टाळण्यासाठी एक सक्रिय पाऊल आहे. अग्निसुरक्षा शिक्षणामध्ये आज वेळ आणि संसाधने गुंतवल्यास जीव वाचू शकतो आणि उद्याच्या आपत्ती टाळता येऊ शकतात. त्यांनी यावेळी आग लागल्यानंतर प्रथमतः आपण आपली काळजी कशी घ्यावी?, आपण आपला बचाव कसा करावा याबाबत विस्ताराने माहिती सांगितली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना आग विझवण्याचे प्रत्यक्षिक करुन दाखवले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या शकांचे निरसन करुन घेतले.  

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले की, कोणतेही संकट किंवा अपघात कधीही कोणाचाही घात करु शकतात. त्यामुळे आपण कायम सतर्क राहाणे आवश्यक आहे. त्यातही अग्निीसुरक्षेच्या बाबतीत जागरुकता खूप जास्त महत्वाची असते. आपण सर्वांनी आगीपासून वाचण्याचे काही सोपे मार्ग लक्षात ठेवले तर नक्कीत आपला जीव वाचू शकतो. त्याकरिता काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

 यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. शेवटी प्रा. शरिफ काझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Posts

Leave a Comment