Home मनोरंजन साई माऊली कलामंच मुंबई तर्फे १२ जानेवारी २०२५ रोजी गिरगाव येथे “कोकणची लोककला” नमन प्रयोगाचे आयोजन

साई माऊली कलामंच मुंबई तर्फे १२ जानेवारी २०२५ रोजी गिरगाव येथे “कोकणची लोककला” नमन प्रयोगाचे आयोजन

Spread the love

साई माऊली कलामंच मुंबई तर्फे १२ जानेवारी २०२५ रोजी गिरगाव येथे “कोकणची लोककला” नमन प्रयोगाचे आयोजन

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (नरेश मोरे) –
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 कोकणातील नावलौकिक असणारा व व्यावसायिक “स्त्री” पात्रांनी नटलेली कोकणची लोककला नमन. या कोकणच्या कलेवर नितांत प्रेम करणारी कलाकार, प्रेक्षक मंडळी व सदा रंगभूमीवर वावरणारे कलाकार यांना मात्र रंगभूमीची व कला सादर करण्याची गोडी लागलेली आहे. या कलाकारांच्या केवळ प्रेमापोटी कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे साई माऊली कलामंच (मुंबई) होय.

रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी साई माऊली कलामंच (मुंबई) यांचा तिसरा प्रयोग रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ३.३० वाजता. मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नी रोड (मुंबई) येथे आयोजित केला आहे.

या नमना दरम्यान दमदार खेळे, श्री गणेश आराधना, गण-गवळण, राधा कृष्णाची प्रेमलीला, पेंद्या वाकड्याची आगळी-वेगळी धमाल आणि मुलाच्या भविष्यासाठी आई- बाप घामाने भिजला, वाटलं होतं म्हातारपण नातवंडं खेळवण्यात आनंदात जाईल पण पैशाच्या अहंकाराने पोटचा पोरं आई-बापाला व कर्तव्याला विसरला. जीवनात आई-बापाच महत्त्व सांगणार एक हृदयस्पर्शी लोकनाट्य व्यथा जीवनाची या नमनात दाखविण्यात येणार आहे.

या कलामंचाचे यशस्वी कलाकार व नवोदित कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असुन कोकणची लोककला जपणारा एक मराठमोळा कार्यक्रम -: लेखक/सुत्रसंचालन/गीतरचना- सचिन ठोंबरे, दिग्दर्शक- रमेश ठोंबरे, गायक- संदेश पालकर , गायिका- प्रथमी मोहिते , ढोलकी- समीर मास्कर, ऑर्गन- संदेश आंबेकर , बँजो-अजय धनावडे, ऑक्टोपॅड- कुंदन साळवी, नृत्यांगना- वैष्णवी घागरे, गौतमी वालम, दर्शना बागकर, दिव्या गोवळकर, अक्षता मोरे, हिरंण्या आंबेकर व इतर सहकलाकार आहेत.

तरी आपण सर्वांनी रंगभूमीवर सादर होणारा कोकणातील लोकप्रिय “नमन” कला या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार व्हा…! नमन या कलेवर प्रेम करणा-या तमाम कोकणवासीय मुंबईकर रशीक प्रेक्षकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रम पहावा असे कलामंचातर्फे आवाहन केले आहे.

तिकीट व अधिक माहितीसाठी संपर्क:-

रेश मोरे- ७०३९४९८६९९, सचिन ठोंबरे- ९९२०७८२३८१, रमेश ठोंबरे-  ७३०४२३६१९६ यांच्याशी संपर्क साधावा.

Related Posts

Leave a Comment