Home क्रीडा मनसेच्या वतीने राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन करणारी कु. मंजिरी विकास जानवळकर सन्मानित

मनसेच्या वतीने राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन करणारी कु. मंजिरी विकास जानवळकर सन्मानित

Spread the love

मनसेच्या वतीने राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन करणारी कु. मंजिरी विकास जानवळकर सन्मानित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम)-

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र प्रमुख विनोद जानवळकर यांच्या वतीने शिरकर एज्युकेशन फाउंडेशन, संचालित लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल, मधील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी व जानवळे गावची सुकन्या कु.मंजिरी विकास जानवळकर हिचा मनसे संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कु.मंजिरी विकास जानवळकर हिने हरियाणा येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय स्काय चॅम्पियनशिप २०२४ – २५ या स्पर्धेमध्ये प्रशिक्षक योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वर्षाखालील ५४ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

तसेच जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये कु. मंजिरी हिने गोल्ड पदक मिळविला व तिची पुढे विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली. तिच्या या यशाबद्दल शिरकर एज्युकेशन फाउंडेशन, लिटिल चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूल, समस्त शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले होते.

क्रीडा स्पर्धा मध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या कु. मंजिरी जांनवळकर हीचे मनसेचे सर्व मनसे पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदनासह  तिला पुढील विविध क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Leave a Comment