Home शैक्षणिक नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण येथील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण येथील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

Spread the love

नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण येथील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~दिशा महाराष्ट्राची/ ठाणे – ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नुतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, कल्याण (पूर्व) येथे मंगळवार दिनांक 7/01/2025 रोजी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित “अविष्कार 2024 – 25 कल्पकतेकडून कृतीकडे” अंतर्गत शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. मिनाक्षी गागरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रदर्शनात ई.6 वी ते ई.9 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर एकूण 61 प्रकल्प सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

प्रदर्शनाचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभा शांताराम गवळी (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, चिंचपाडा, कल्याण पूर्व ) व मा. सौ भारती ओंकारेश्वर (मुख्याध्यापक, जरीमरी प्राथमिक विद्यालय, कल्याण पूर्व यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रदर्शनाचे परीक्षण मा. श्री मिलिंद धंबा (सहाय्यक शिक्षक, गणेश विद्या मंदिर, कल्याण पूर्व) आणि मा. श्रीमती योगिता अरविंद मिसर (सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, चिंचपाडा, कल्याण पूर्व) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले आणि विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.

प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पतींचे उपयोग, पुर्नप्रक्रियाआणि पुर्नवापर, भारतीय संशोधकांनी लावलेले शोध, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती, संगीतमय विज्ञान प्रकल्प व सादरीकरण, वैद्यकीय शास्त्र यांसारख्या विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले या सर्व प्रकल्पांनी पालकांचे , परीक्षकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रेक्षकांची मनी जिंकली.

पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या नव्या संधींची ओळख झाली आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली.

Related Posts

Leave a Comment