Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मुंडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Spread the love

मुंडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड-



मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतीच सांस्कृतिक विभाग, महिला विकास कक्ष व विशाखा समिती यांच्या संयुक्त विद्यामाने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. संगीता घाडगे, प्रा. महादेव वाघ, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. विष्णु जायभाये यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

डॉ. राहूल जाधव म्हणाले की आधुनिक भारतातील एक आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोलाचे आहे. आज स्त्रियानी अनेक क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये ही क्रांती झाली असली तरी आजही शहरासह गा्रमीण भागतही स्त्रियांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. याकरिता आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांचा वसा हाती घेणे आवश्यक आहे. आठराव्या शतकामध्ये स्त्री षिक्षणाचा पाया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी घातला आहे व आज 21व्या शतकातध्ये त्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले आपणास दिसून येत आहे.

कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी डॉ. ज्योती पेठकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Posts

Leave a Comment