Home शैक्षणिक जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Spread the love

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



दिशा महाराष्ट्राची/ आबलोली- (संदेश कदम)


गुहागर तालुक्यातील खोडदे यथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची १९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कु. आदिती संदेश साळवी, कु.गार्गी प्रशांत गुरव, कु. स्वरा मनोज साळवी, कु. निधी उमेश पवार यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मौलिक मार्गदर्शन करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन केले.

यावेळी महिला शिक्षक दिन आणि कन्या दिनाचे औचित्य साधून लहान कन्या व महिला शिक्षक भगिनींना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आदर्श शिक्षिका आणि स्त्रि शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्याविषयी मुख्याध्यापिका प्रिता गावंडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदेश साळवी, शिक्षण तज्ञ श्री. विलास गुरव यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, उपशिक्षिका संध्या पाटिल, मदतनीस मयूरा साळवी आदी. मान्यवर उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment