परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल, आरमोरी येथे विविध उपक्रमांनी रंगला संविधान दिवस
दिशा महाराष्ट्राची/ आरमोरी
संविधान राष्ट्राचा अभिमान ही भावना मुलांमध्ये वृद्धिंगत करण्याच़्या उद्देशाने आरमोरी येथील परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भारतीय संविधान दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी, मान्यवर, शिक्षकवृंद कर्मचारी गण यांनी संविधानाच्या प्रास्तविकेचे एकत्रितपणे वाचन केले. समूह नृत्य लतिका मांजी, वासंती पुंगाटी, वैष्णवी सिडाम, सुप्रिया आत्राम,जानवी पुराम, ज्योति परसा, राधिका सपाटे, रुद्रानी कत्रे, सृष्टी दडमल, सुनिधी कोसरीया, लाजरी पेंदाम, अनुष्का चापले, युक्ती महानंदे, रेनु देशमुख, डाॅली गोंदोले, ओम धाईत, अमर तागडे, राही डोंगरावर, जयश्री तिजारे, मानसी निकुरे, बारबी मेश्राम, श्वेता नवरत्ने. समूह गीत रूची डोंगरवार, हीना मुरकुटे, अंतरा जुआरे संविधान भाषण कनिष्का कवंडर, हिना मुरकुटे, मृणाली हारगुले, पोमेश कोसरीया, नंदिनी सोरते, तृषा भैसारे, आयुश बुद्धे, पार्श्व मांडवकर, अमर चिचघरे, दक्ष शेंडे, रोहन एंचिलवार, रोहन शिंगाडे, उत्कर्ष टिचकुले वेशभूषा वंश निंबेकार, भार्गवी धोंगडे, लक्ष आभारे, जाजवल्या देशपांडे. संविधान चित्रकला निधीता ठाकरे, श्रद्धा दडमल, संस्कार मडावी यांनी विविध उपक्रमात सहभाग नोंदविला.
सामान्य जनांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संविधान रॅलीचे आयोजन बुद्धविहार परिसरात करण्यात आले. इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी “संविधानाचा जागर” या पथनाट्याचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता अवचट, सपना सिडाम, जितेंद्र बर्डे, सिंधु म्हशाखेत्री, माधुरी भोयर, प्रशांत कत्रे, संतोष प्रधान प्रणाली सहारे समस्त शिक्षकवृंद यांनी केले. शाळेचे संस्थापक गोविंदराजन कवंडर सर यांनी व इतर मान्यवरांनी संविधान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.