Home शैक्षणिक आरमोरी येथील परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

आरमोरी येथील परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी

Spread the love

आरमोरी येथील परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी



दिशा महाराष्ट्राची/ आरमोरी-

 

आरमोरी येथील परॉडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक गोविंदराजन कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापिका सुजाता अवचट उपमुख्याध्यापिका किरण नेऊलकर, सपना सिडाम, वर्षा रायपुरे, रुपाली बडवाईक इतर शिक्षकवृंद विद्यार्थी गण उपस्थित होते.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. विद्यार्थीनी दीक्षा उसेंडी, प्रतिक्षा कोडाप तनिष्का कुंमरे, रेणु देशमुख, राधिका सपाटे, तृषा भैसारे, अद्वैत राऊत यांनी शिक्षणाचे महत्त्व व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. तसेच “आजची स्त्री जी तिच्या क्षेत्रात प्रगती पायावर उभी आहे व प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेत आहे ते ह्या महापुरुषामुळेच आणि आपण त्यांचे ऋणी आहोत” असे स्पष्ट मत सुद्धा व्यक्त केले. मुलांसाठी भारतीय शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले या निबंध स्पर्धेचे आयोजन इयत्ता आठवी ते दहावीसाठी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कत्रे यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली.

Related Posts

Leave a Comment