Home क्रीडा श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय वैयक्तिक (मैदानी) स्पर्धेत उत्तुंग यश

श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय वैयक्तिक (मैदानी) स्पर्धेत उत्तुंग यश

Spread the love

श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय वैयक्तिक (मैदानी) स्पर्धेत उत्तुंग यश



दिशा महाराष्ट्राची/ दापोली :-


 

SVJCT डेरवन तालुका चिपळूण येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय वैयक्तिक स्पर्धेत श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय, पंचनदी तालुका दापोलीच्या खालील खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

प्रणित संजय खळे– 5 किमी चालणे (प्रथम क्रमांक) तसेच 1500 मीटर धावणे (तृतीय क्रमांक), आयुष अंकुश कानसे– उंच उडी (प्रथम क्रमांक), ओम अजित खळे- 5 किमी चालणे (तृतीय क्रमांक), समर्थ राजेंद्र राणे- 110 मीटर अडथळा शर्यत (पाचवा क्रमांक) पटकावून शाळेचे तसेच स्वतःचे नाव रोशन केले आहे.

प्रशिक्षक – साळुंखे सर यांच्यासोबत

यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षक श्री. आशुतोष साळुंखे सर यांचे लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी संस्थेचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र कुटरेकर काका, उपाध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले.

शाळा समितीचे अध्यक्ष श्री. सुनिल देवळेकर सर यांनी सर्व खेळाडूंचे मनस्वी अभिनंदन केले. पालक शिक्षक व ग्रामस्थ या सर्व स्तरावरून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment