सिद्धार्थ महाविद्यालय एन. एस. एस युनिट तर्फे सावरोली गावात वृक्षारोपण
दिशा महाराष्ट्राची/ मुंबई :-
मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय एन. एस. एस युनिट (बुद्ध भवन) यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथील सावरोली गाव येथे नुकताच वृक्षारोपण उपक्रम करण्यात आला. यावेळी एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी एकूण १०० हून अधिक वृक्षारोपण केले. सोबत हातात वृक्षारोपण संबंधित पोस्टर घेवून गावामध्ये वृक्षारोपणाची जनजागृती केली.
या उपक्रमात सिद्धार्थ महाविद्यालय एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. धनंजय चंदनशिवे आणि प्रा. नरेश लाडे उपस्थित होते. सोबतच वृक्षारोपण उपक्रमाला सहकार्य म्हणून माजी एन.एन.एस.स्वयंसेवक देखील उपस्थित होते. Siya Green Creation ( सिया हरी सृष्टी) बदलापूर यांनी रोपटी देवून तर गावातील ग्रामपंचायत सदस्य स्वयंसेवक जालिंदर तळपाडे आणि अजय डोंगरे यांनी वृक्षारोपणासाठी जागा देवून सहकार्य केले.