कविता
विषय- आगमन बाप्पाचे
(दिशा महाराष्ट्राची )
होता आगमन बाप्पाचे
सजली सारी नगरी
सुख आंनद घेऊन
आज बाप्पा आले घरी।।१।।
भाद्रपद चतुर्थीला
श्रीगणेश करी आगमन
त्यामुळे होते सर्व कार्य
आणि प्रसन्न होते मन।।२।।
सजला मंडप दारात
आले गणराय घरात
गणरायाच्या स्वागताला
रांगोळी काढू अंगणात।।३।।
विविध रूप गणपतीचे
मनाला आनंद देतात
आनंद आणि हर्षाने
आपली झोळी भरतात।।५।।
बाप्पा तुमच्या स्वागताला
मोदक लाडू आम्ही केले
शुभ पावलांनी घरी यावे
सृष्टीला ही नवचैतन्य आले।।६।।
बाप्पा तुमच्या आगमनाने
सर्व आनंदून गेली नगरी
जणू स्वर्गाचे स्वरूप आले
आज खरोखर प्रत्येक घरी।।७।।
वाजत गाजत आले बाप्पा
भरून गेले आमचे मन
चैतन्याचा सोहळा सजला
आनंदी झाले आमचे जीवन।।८।

कवयित्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर