Home राजकीय मनसेचे प्रमोद गांधी यांचा खेड विभागात गावभेटी दौरा

मनसेचे प्रमोद गांधी यांचा खेड विभागात गावभेटी दौरा

Spread the love


मनसेचे प्रमोद गांधी यांचा खेड विभागात गावभेटी दौरा



(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर – उदय दणदणे)


 

गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसे चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी इच्छुक असल्याने त्यांनी जनसंपर्क साधण्याबरोबर गावभेटीतून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी प्रभाकर सोलकर (मू.पो. कासईताटरेवाडी यांच्या घरी गांधी यांनी गणपती बापाच्या दर्शनासाठी घेतले. त्याचबरोबर वाडीतील ग्रामस्थ मुंबई चाकरमानी यांच्या सोबत गाव मिटींग संपन्न झाली. त्याचबरोबर मु. पो. खोपी लाडवाडी ता. खेड येथे मुंबई ग्रामस्थ व मुंबई चाकरमानी यांच्या सोबत गावमीटिंग संपन्न झाली. सदर गावभेटीतून संवाद साधताना ग्रामस्थांबरोबर गाव/ वाडी विकासावर विविधांगी चर्चा झाली. सदर गावभेटीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे गांधी यांनी सांगितले.

सदर गावभेटी मिटींगला गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, खेड तालुका अध्यक्ष निलेश बामने, खेड उपतालुका अध्यक्ष तुषार खोपकर, विभाग अध्यक्ष अश्विन उतेकर, मुंढर तालुका अध्यक्ष सुजीत गांधी, सोहम गांधी आदी कार्यकर्ते पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment