गुहागर मनसेचा गावभेटी दौरा सुरू; नागरिकांचा लाभतोय उदंड प्रतिसाद
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा नियोजित आणि जाहीर केलेल्या गावभेटी दौऱ्याला गणेश चतुर्थीच्या शुभदिनी वाकी या गावातून श्री गणेशा झाला असून गुहागर विधानसभा मतदार संघात मनसेचा गावभेटी दौऱ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
रविवार दिनांक ०८ सप्टेंबर२०२४ रोजी दोडवली येथील कांबळे वाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गावभेट घेऊन वाडीतील नागरिकांशी संवाद साधत विकासाबाबत महत्वपूर्ण चर्चा केली आणि धारेवरचा राजा सार्वजनीक गणेशोत्सवातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम तसेच शाखाअध्यक्ष सचिन निकम यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत जितु साळवी, सुजित गांधी, सचिन निकम आणि दोडवलीतील अनेक महाराष्ट्र सैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.